घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचोरट्याचे धाडस; चक्क पोलिसांची 'सरकारी' दुचाकी पळवली

चोरट्याचे धाडस; चक्क पोलिसांची ‘सरकारी’ दुचाकी पळवली

Subscribe

नाशिक : शहरात वाहनाचोरीच्या  घटनांमध्ये वाढ झाली असतानाच आता चोरट्यांनी थेट पोलिसांचीच पेट्रोलिंगसाठी वापरली जाणारी दुचाकी लंपास केल्याचे समोर आले आहे. शिवाय, नाशिक शहरातून तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची अ‍ॅण्टी व्हेईकल थीफ स्क्वॉड वाहनचोरीचे प्रकार रोखण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोलीस हवालदार नरेंद्र शिवाजी चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, चौधरी यांना नाशिक शहरात गस्त घालण्यासाठी सरकारी दुचाकी (एमएच- १५ – ८२०४) देण्यात आली आहे. ही दुचाकी त्यांनी शुक्रवारी (दि. ६) वॉशिंगसाठी आडगाव येथील डी- मार्टशेजारी असलेल्या ऋतुजा वॉशिंग सेंटर येथे लावली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी ती दुचाकी लंपास केली. ते दुचाकी परत घेण्यासाठी गेले असता त्यांना दुचाकी लंपास झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आडगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेत, कैलास गणपत पगारे (रा. अपेक्षा अपार्टमेंट, जेल रोड) यांची दुचाकी (एमएच- १५- बीक्यू- ४५१६) गेल्या ९ नोव्हेंबरला गौरी पटांगणावरून चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसर्‍या घतनेत, अमित प्रकाश अग्रवाल (रा. गणेश भवन, रविवार पेठ) यांची मोपेड (एमएच- १५- एचएक्स- ४७७४) ३ डिसेंबरला पहाटे अ चोरट्याने राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसर्‍या घटनेत, जोएब हनिफ शेख (रा. रेणुकानगर सोसायटी, वडाळा नाका) यांची मोपेड (एमएच- १५-१७९२) ४ डिसेंबरला मध्यरात्री चोरट्याने राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -