घरमहाराष्ट्रहुंड्यासाठी सुनेची हत्या

हुंड्यासाठी सुनेची हत्या

Subscribe

विवाहात हुंडा न दिल्याने सूनेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

हुंड्याच्या तक्रारीनंतर पतीला अटक करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय बदलला आहे. त्यामुळे आता पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केल्यास पतीला लागलीच अटक करता येणं शक्य आहे. मात्र पुण्यामध्ये हुंड्यासाठी पतीने नाहीतर सासू, दीर आणि नणंदेने छळ करुन एका विवाहीतेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहात हुंडा न दिल्याने महिलेचा दीर, सासू, मामेसासू आणि नणंदेने महिलेची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायकबाब उघडकीस आली असून या चौघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील धानोरी परिसरातील आनंद पार्क सोसायटीमध्ये रेड्डी हे कुटुंब राहत होते. या कुटुंबातील सून कविता चेतन रेड्डी हिचा चेतन रेड्डीयांच्यासोबत दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. हे कुटुंब आनंदात राहत होते. मात्र कविताच्या माहेरच्यांनी विवाहात हुंडा न दिल्याने कविताची सासू, दीर आणि नणंद तिचा सतत छळ करत होते. सासूच्या त्रासाला कंटाळून कविताने सासूशी बोलणे देखील बंद केले होते. मात्र शुक्रवारी अचानक सासूने कविताला हाक मारुन तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान दीर, नणंद आणि मामेसासू त्या दोघांच्या भांडणात पडले. वाद वाढत गेल्याने भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. या चौघांनी मिळून कविताचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

गुन्हा कसा उघडकीस आला

कविता आणि तिच्या सासूचा वाद सुरु होता. त्याचदरम्यान कविताच्या वडिलांचा कविताला फोन आला होता. त्यामुळे कविताच्या वडिलांनी आपल्या मुलीचा सासूशी झालेला वाद ऐकला. मात्र त्यांचे संभाषण ऐकताना त्यांचा फोन कट झाला त्यांनी पुन्हा कविताला फोन लावला असता तिचा फोन बंद आला. त्यानंतर तिच्या वडिलांनी जावई चेतन रेड्डीला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कविताचा फोन बंद येत असल्याने चेतने घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्यानंतर चेतने पाहिले असता कविता बेशुद्ध अवस्थेत पडली होती. चेतने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या आरोपींना केली अटक

विवाहात हुंडा न दिल्याने कविताचा छळ करणाऱ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दीर सोनू अंजनिया रेड्डी (२४) याच्यासह त्याची आई, मामेसासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. कविताचे वडिल करबसप्पा हणमंतराव मळ्ळी (६०) यांनी केलेल्या तक्रारीनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए.जी.सायकर अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – हुंड्याच्या तक्रारीत पतीला लागेच अटक होणार!

वाचा – हुंड्यासाठी अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

वाचा – व्हॉट्सअॅपमुळे लग्नाआधीच मोडला संसार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -