घरमहाराष्ट्रपुण्यात पूर्ण वेळ शाळा भरणार

पुण्यात पूर्ण वेळ शाळा भरणार

Subscribe

पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाली आहे. त्यावेळेस शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुण्यात पहिली ते आठवीपर्यंत शाळा पूर्ण वेळ भरणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सध्या जागतिक परिस्थिती पाहता नवीन रुग्णसंख्येमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. परंतु दैनंदिन कोविड मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजची कोरोनाची परिस्थिती पाहता आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात आणि जगात हीच परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातही नियम शिथिल करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

फ्रान्स, अमेरिका या देशात नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर जर्मनी आणि युनायटेड किंगडमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मात्र, आपल्या देशात गेल्या आठवड्याच्या तुलनेत देशपातळीवर ३० टक्के, राज्यात ४२ टक्के आणि पुणे जिल्ह्यात ५० टक्केे घट झाली आहे. पुण्यातील रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

लसीची कमतरता पडणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच कोरोना निर्बंध लावण्याचे अधिकार जिल्हा पातळीवरील अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबद्दल २८ फेब्रुवारीपर्यंत विचार करू आणि मार्चमध्ये निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -