घरताज्या घडामोडीChief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती, तीन महिने कार्यकाळ

Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती, तीन महिने कार्यकाळ

Subscribe

महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी मावळते मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून स्विकारला पदाचा कार्यभार

राज्याचे मुख्य सचिवपदी असलेल्या सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्या सेवेचा कालावधी आज ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. राज्य सरकारने केंद्राला मुदतवाढीच्या प्रस्तावावर अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच राज्याच्या मुख्य सचिव पदाची तात्पुरती जबाबदारी ही सेवा जेष्ठतेनुसार देवाशिष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांच्याकडे दिली आहे. देबाशीष चक्रवर्ती हेदेखील येत्या काही महिन्यात निवृत्त होत आहेत. पण सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीबाबतचा कोणताही निर्णय केंद्राकडून न आल्याने देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा पदभार सीताराम कुंटे यांनी दिला. (Debashish Chakraborty took maharashtra chief secretary charge from sitaram kunte )

देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत देबाशीष चक्रवर्ती हे अव्वल स्थानावर होते. ते १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. पण चक्रवर्तींच्या नावाची शिफारस मुख्य सचिवपदी होण्याची शक्यता कमी होती. कारण त्यांचा कार्यकाळही फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. कुंटे यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच अवघ्या तीन महिन्यातच ते सेवानिवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या सनदी अधिकाऱ्यांच्या सेवेचा कमी कालावधी असेल तर, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या पसंतीचा अधिकारी या पदावर नियुक्त होईल अशी अपेक्षा होती. पण सेवा जेष्ठतेनुसार चक्रवर्ती यांची वर्णी या पदासाठी लागली.

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाच्या काळात सीताराम कुंटे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीचे कौतुक म्हणून त्यांच्या सेवा मुदतवाढीचा प्रस्ताव हा केंद्राकडे पाठविण्यात आला होता. पण सीताराम कुंटे यांच्या नावाला राज्यातील भाजपकडून विरोध होता. तसेच आयएएस लॉबितील अनेक अधिकारी हे कुंटे यांना मुदतवाढ मिळू नये यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे कुंटे यांना मुदतवाढ न देता ठाकरे सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्याला सेवेत मुदतवाढ न देण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. सीताराम कुंटे हे आज आपल्या सेवा कालावधीनुसार निवृत्त झाले. त्यांनी निवृत्त होताना मुख्य सचिव पदाचा कार्यभार हा अतिरिक्त मुख्य सचिवपदी असणाऱ्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे दिला.

सीताराम कुंटे हे १९८५ च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. सीताराम कुंटे यांनी राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे संकट असताना चोख कामगिरी बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक असे सीताराम कुंटे आहेत. सीताराम कुंटे यांनी मुख्य सचिवपदी जबाबदारी स्विकारण्याआधी संजय कुमार यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती.

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुली आरोपाच्या प्रकरणात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यामुळेच या प्रकरणात चौकशी सुरू असताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब सीबीआयकडून नोंदवण्यात येत आहेत. सदर प्रकरणात सीताराम कुंटे यांनाही सीबीआयने समन्स जारी केला होता. पण सीताराम कुंटे हे चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळेच वादात भर पडली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात न्यायालयात धाव घेतली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -