घरमहाराष्ट्रकर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

कर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

Subscribe

३१ मार्चपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाही, तर संबंधित शेतकरी आणि बँकांचे कर्ज खाते थकीत होणार असल्याने बँका देखील अडचणीत येणार आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी येत्या २८ फेब्रुवारीला जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीहून जास्त शेतकर्‍यांची नावे या यादीत असतील अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येणार असल्याचे निवेदन सहकार मंत्री पाटील यांनी विधान परिषदेत दिले. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, अचूकता यावी यासाठी टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यात येत असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा – कर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला होणार जाहीर


या निवेदनानंतर विरोधी पक्षांनी मात्र आक्षेप नोंदविला. शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, ३१ मार्चपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाही, तर संबंधित शेतकरी आणि बँकांचे कर्ज खाते थकीत होणार असल्याने बँका देखील अडचणीत येणार आहेत. ही तांत्रिक बाब असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा सभापती रामराजे निंबाळकर यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बँकांना नाबार्ड आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन मार्ग काढावा असे निर्देश दिले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -