घरताज्या घडामोडीराजसाहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील, दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंना...

राजसाहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील, दिपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया पार पडणार आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राजसाहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

दिपाली सय्यद यांनी ट्विट करत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकप्रकारे राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकी नंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजुन अर्धवट आहे, असं दिपाली सय्यदांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

दिपाली सय्यद यांनी याआधीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वंयघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वंयघोषीत हिंदुजननायक!, असं ट्विट सय्यद यांनी केलं होतं.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडं घातलं. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना केली. दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नये, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्यावात, असं आवाहन राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना केलं होतं. तसेच त्यांनी पुणे दौरा देखील रद्द केला होता.


हेही वाचा : कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नका, वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मनसैनिकांना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -