घरमहाराष्ट्रDeglur by-election: देगलूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची जितेश अंतापूरकरांना उमेदवारी

Deglur by-election: देगलूर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची जितेश अंतापूरकरांना उमेदवारी

Subscribe

नांदेडमधील  देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur by-election) काँग्रेसने जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे देगलूर मधील जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यामुळे या रिक्त जागेवर काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबत चर्चा होत्या.

अखेर काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जितेश अंतापूरकर यांच्यासाठी ही पोटनिवडणूक सोपी नसणार आहे. कारण याच ठिकाणी पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे जे आता भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचं आव्हान जितेश अंतापूरकर यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे नांदेडमध्ये या पोट निवडणुकीच्या निमिताने दिवाळी आधीच फटाखे फुटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष जरी एकत्र लढत असले तरी भाजप चांगली झुंज देईल.

- Advertisement -

याआधी पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढली होती. तरी देखील भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता. विद्यमान आमदार, खासदाराचं निधन झालं तर त्याच्या पत्नीला, मुलाला किंवा मुलीला उमेदवारी देण्यात येते. विरोधी पक्ष आणि मतदारांची देखील सहानुभूमी मिळविण्याचा तो एक प्रघात असतो. परंतू पंढरपूरमध्ये भाजपने उमेदवारी देऊन विजय खेचून आणला होता. त्याचप्रमाणे पंढरपूर-मंगळवेढा पॅटर्नची पुनरावृत्ती करणार की काय याकडे देखील साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

सुभाष साबणे यांची बंडखोरी

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. साबणे यांनी यापूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. गेल्यावेळी बिलोली देगलूर मतदारसंघात स्वर्गीय अंतापूरकर यांनी ८९ हजार ४०७ मते घेत आपले प्रतिस्पर्धी सुभाष साबणे यांचा जवळपास वीस हजार मताच्या फरकाने पराभव केला होता. त्यावेळी साबणे यांना ६६ हजार ९७४ मते मिळाली होती. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -