घरताज्या घडामोडीडेल्टा प्लस अधिक धोकादायक , गाफिल राहू नका

डेल्टा प्लस अधिक धोकादायक , गाफिल राहू नका

Subscribe

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे प्रशासनाला निर्देश

कोविड १९ च्या संदर्भात संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी स्थापित केलेल्या प्रयोगशाळांनी सुचित केल्यानुसार डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. हा विषाणू घातक आहे. याबाबत केंद्रानेही राज्याला पत्र देवून सर्तकता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानूसार संभाव्य धोका लक्षात घेता ऑक्सिजन सुविधायुक्त बेडस,पुरेसा औषधसाठा करण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदी यंत्रणांना निर्देश दिले असून ऑक्सिजन व्यवस्थापन सुत्र निश्चित करून देण्यात आले आहे. त्यामुळे दुसर्‍या लाटेतील रूग्णसंख्या स्थिरावत असली तरी, गाफिल राहू नका असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिले.

स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ते आज नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत बोलतांना कुंटे म्हणाले, राज्य टास्क फोर्सच्या संकेतानूसार राज्यात तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी आरोग्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीसाठी भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बेडसची संख्या वाढवितानाच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे. प्रामुख्याने दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची कमतरता मोठया भासली अशी स्थिती उदभवू नये ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

लसीकरणाबाबत बोलतांना ते म्हणाले, राज्यांना केंद्राकडून लस पुरवठा केला जातो. केंद्राने डिसेंबरपर्यंंत कशा पध्दतीने लस दिली जाणार याचे नियोजन दिले आहे. जुलै महिन्यात सव्वा कोटी डोस प्राप्त होणार आहेत. आम्ही प्रती दिन १० लाख लोकांच्या लसीकरणाची तयारी ठेवली आहे. लसींच्या उपलब्धतेनूसार ७ लाखापर्यंतचा टप्पा आपण गाठला आहे. आजही देशात महाराष्ट्र लसीकरणात पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. लस जसजशी उपलब्ध होईल लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -