घरताज्या घडामोडीसनदी अधिकार्‍यांच्या गुडबुकमध्ये अजितदादा

सनदी अधिकार्‍यांच्या गुडबुकमध्ये अजितदादा

Subscribe

कामात वाघ असणारा राजकारणी अशी अजितदादांची ओळख टॉप टू बॉटम अशी प्रशासनात आहे. वेगवान निर्णय, झटपट निवाडा, कामाचा तत्काळ निपटारा आणि शक्यप्राय सोल्यूशनपर्यंत एखादा विषय नेणारा राजकारणी म्हणून अजितदादा हे सनदी अधिकार्‍यांच्या पसंतीचे आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळात पोर्टफोलिया जाहीर झालेला नसला तरीही उपमुख्यमंत्री पदासाठी मात्र अजितदादांच्या नावालाच सनदी अधिकार्‍यांचाही कौल आहे.

अजितदादांच्या याआधीच्या प्रशासनासोबतच्या कामगिरीनुसार सनदी अधिकार्‍यांसोबतचे त्यांचे ट्युनिंग चांगले आहे. काही अपवाद वगळले तर सनदी अधिकार्‍यांमध्येही अजितदादांच्या कामाबाबतची चांगलीच छाप आहे. एखाद्या प्रकरणात सडेतोड निर्णय घेणे, सनदी अधिकार्‍यांच्या निर्णयाचा मान ठेवणे तसेच एखाद्या विषयात माहितीपूर्ण आणि अभ्यासूपणे निर्णयाअंती येणे यासारख्या स्वभावामुळेच अजितदादा सनदी अधिकार्‍यांच्याही पसंतीचे राजकारणी आहेत. सनदी अधिकार्‍यांप्रमाणेच सर्वपक्षीय आमदारांमध्येही अजित दादांसाठीच क्रेझ आहे.

- Advertisement -

पण जे काम शक्य असेल त्यात स्पष्टपणे न्यायनिवाडा करण्याची अजिदादांची काम करण्याची अजितदादांची स्टाईल आहे. तिथे करतो, सांगतो असे प्रकार अजित दादांकडून होत नाही. एखाद काम आऊट ऑफ द वे जाऊन करायचे असेल आणि ते करण शक्य नसेल तेव्हा अजितदादा मात्र त्याच ठिकाणी हे काम नाही होणार इतक स्पष्टपणे सांगतात. त्यामुळेच अजितदादा आपल्या अशा स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी संबंधित एखादा विषय ताटकळत न ठेवता झटपट निर्णय प्रक्रिया हाच गुण सनदी अधिकार्‍यांनाही आवडणारा असा आहे.

सातच्या आत हजर

शिस्तीच्या तसेच वेळेच्या बाबतीत अजित दादांची असणारा काटेकोरपणा हा संपुर्ण प्रशासनाला चक्रावणारा असा आहे. अनेकदा अजिददादा हे मंत्रालयात शिपायाच्या आधीही पोहचल्याचे किस्से मंत्रालयात एकायला मिळतात. सकाळी ५.३० वाजल्यापासून वृत्तपत्रांच वाचन करून अजितदादा हे ७ वाजल्यापासून जनता दरबारातल्या पहिल्या अपॉयमेंटसाठी तयार असतात. नागपुर अधिवेशनात एकदा अजितदादांना सकाळी वृत्तपत्रे उपलब्ध होत नव्हती. तेव्हा अजितदादांनी आपली नाराजी मांडली होती. पण एका महावितरणच्या अधिक्षक अभियंत्याने पहाटे ४ वाजताच वृत्तपत्रे घरी पोहचवल्यानंतर अजितदादांनी अधिक्षक अभियंता आणि वृत्तपत्र उपलब्ध करून देणार्‍या दोघांनाही बोलावून त्यांच्या कामाचे कौतुक केले होते. कामाच्या वेळा पाळणारे तसेच कामात हलगर्जी करणार्‍यांविरोधात कडक शिस्तीचा दरारा असणारे अशीच एकुण अजित दादांची कामाची पद्धत आहे. म्हणूनच शिस्तप्रिय तसेच वक्तशीर राजकारणी म्हणून त्यांचे अनेक चाहते आहेत.

एक प्रतिक्रिया

  1. सनदी अधिकाऱ्यांना मोकळं रान मिळत असेल तर का नाही खुश होणार ?

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -