घरमहाराष्ट्रनागपूरDevendra Fadnavis: महिला दिनी देवेंद्र फडणवीसांनी केला नावात बदल

Devendra Fadnavis: महिला दिनी देवेंद्र फडणवीसांनी केला नावात बदल

Subscribe

नागपूर : महिला दिनाच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावात बदल करत असल्याची घोषणा केली. ते नागपूरमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी आता वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लावणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, महिला दिनाच्या निमित्त राज्य सरकारच्या वतीने नवीन महिला धोरण जाहीर करण्यात आलं.

हेही वाचा – Supriya Sule : हे तर सुडाचे राजकारण; का म्हणाल्या सुप्रिया सुळे असं…

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर्वी मी माझं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस सांगायचो आता माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असं असेल. आईचं नाव देखील वडिलांच्या नावासोबत पाठीमागे लागणार आहे. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. महिला दिनाच्या निमित्तानं आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये बोलत होते.

हेही वाचा – LokSabha : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी पुन्हा वायनाडमधून मात्र ‘हा’ उमेदवार गायब

- Advertisement -

यापूर्वी अनेकांनी आपल्या नावापूर्वी आईचे नाव लावायला सुरुवात केली होती. त्यातच आता राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्या या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत केले जात आहे.

हेही वाचा – MLA Disqualification Case : उद्धव ठाकरेंचे ‘ते’ आरोप राहुल नार्वेकरांनी खोडून काढले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -