OBC आरक्षण : आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका घेऊ नका – फडणवीस

राज्य मागास आयोग वर्गाला इम्पेरिकल डेटा जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती भाजपकडून करण्यात आली - देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis reaction after all parties OBc meeting
OBC आरक्षण : आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका घेऊ नका - फडणवीस

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्य मागास आयोगाला ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यास सांगणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही मात्र ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक असून राज्य मागास आयोगाला इम्पेरिकल डेटा गोळा करण्यावर चर्चा करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ देणार नाही असा इशारा पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सर्वपक्षीय ओबीसी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा बैठक झाली आहे. या बैठकीत तात्काळ आरक्षणा लागू झाले पाहिजे तसेच जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही. तोपर्यंत निवडणूका होऊ देणार नाही. अशा भूमिकेवर भाजप अजूनही ठाम राहिली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडे अनेक मुद्दे मांडले होते त्यासंदर्भात लॉ आणि न्यायपालिकेने सकारात्मक भूमिका दाखवली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकूणच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टनुसार कारवाई केली तर आता ओबीसींच्या जागा वाचवता येतील. परंतु ५ जिल्ह्यांमध्ये मोठी अडचण निर्माण होईल आणि त्यातील ३ जिल्ह्यांतील जागा आपल्याला वाचवता येणार नाही. मात्र ५२०० जागांपैकी ४५०० जागा वाचू शकतील असे मुख्य सचिव आणि न्यायपालिकेने सांगितले आहे.

राज्य मागास आयोग वर्गाला इम्पेरिकल डेटा जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती भाजपकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आजच्या बैठकीत असे ठरले आहे की, राज्य मागास आयोगाला इम्पेरिकल डेटा जमा कऱण्यास सांगण्यात यावे, जोपर्यंत त्यांचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. तसेच ज्या जिल्ह्यांतील जागा जास्त कमी होणार आहेत तेथील जागांवर विचार करुन त्या जागा भरुन काढण्यात याव्यात अशी चर्चा केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : आम्ही तुमच्या सोबत, काळजी करु नका; मुख्यमंत्र्यांनी केली कल्पिता पिंपळेंची विचारपूस