घरमहाराष्ट्रशिवराय आमचे प्रेरणास्त्रोत, शिवजयंतीवर निर्बंध टाकणे चुकीचे - फडणवीस

शिवराय आमचे प्रेरणास्त्रोत, शिवजयंतीवर निर्बंध टाकणे चुकीचे – फडणवीस

Subscribe

कोरोना परिस्थिती आम्हाला मान्य आहे परंतु कोरोना परिस्थितीची आठवण ही शिवजयंतीलाच कशी झाली?

राज्यात आज (शुक्रवार,१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१वी जयंती आहे. दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात शिवजयंती साजरी केली जाते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना नियमांचे निर्बंध लावण्यात आले आहेत. रायगड आणि शिवनेरीसह अनेक किल्ल्यांवर मोजक्याच लोकांच्या उपस्थित शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी माहाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.

कोरोना परिस्थिती सत्तारुढ पक्षाचे मोर्चे जोरात चालले आहेत. सत्तेत असलेल्या पक्षांचे सभा जोरात सुरु आहेत. मग अशा परिस्थिती फक्त शिवजयंतीवर निर्बंध का? छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये हिंदु म्हणून जगतो आहोत याचे एकमेव कारण हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची जयंती प्रेरणा देणारी असते. त्यामुळे शिवजयंतीवर निर्बंध टाकणे हे अत्यंत चुकीचे आहे. कोरोना परिस्थिती आम्हाला मान्य आहे परंतु कोरोना परिस्थितीची आठवण ही शिवजयंतीलाच कशी झाली असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिवजयंतीलाच का घातले सत्ताधाऱ्यांच्या मोठ्या बैठका होत आहेत. त्यांच्या मोर्चा आणि मेळाव्यांना का निर्बंध लादले आहेत. राज्य सरकारमध्ये मोगलाई लागले. राज्य सरकार सामान्य जनतेवर अन्याय करत आहे. कोरोना काळानंतर सरकारने नागरिकांना मदत करायला हवी परंतु हे सरकार पुर्वीच्या मोगलांसारखे वागत आहे त्यामुळे हे मोगलाई सरकार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


हेही वाचा: रायगडावर विद्युत रोषणाई , खासदार संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याला खडसावले

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -