घरताज्या घडामोडीएनसीबीला धमकावणं अयोग्य, राज्यातील विषयांवर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप

एनसीबीला धमकावणं अयोग्य, राज्यातील विषयांवर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप

Subscribe

एनसीबीच्या कारवाईवर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आरोप करत आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातील विषयांवर दुर्लक्ष करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून एनसीबीच्या कारवाईवर आरोप कारण्यात येत आहेत. आरोप होत असतील तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर अधिक बोलण्याचे टाळले आहे परंतु राज्य सरकारवर फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले की, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करणं हे योग्य नाही आहे. कारण ते संवैधानिक पदावर आहेत. संवैधानिक पदावरील माणसांवर आरोप लावायचे आणि आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणून त्यातून नवे विषय सुरु करायचे हे योग्य नाही आहे. साक्षीदारांची विश्वासर्हता समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कोणतीच केस टिकणार नाही. या प्रकरणात आरोप निश्चित झाले आहेत. त्यामुळे एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही आहे. असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय हेतून करत असल्याचा आरोप केला होता. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले एनसीबीचा राजकीय वापर काय करणार, एनसीबी ड्रग्ज प्रकरणात कारवाई करते. मग हे सरकार ड्रग्जवाल्यांची पाठराखण करत आहेत का? त्यांचे दुखणं वेगळं आहे. जे काही छापे पडलेत त्यातून जी काही माहिती समोर आली आहे. यातून हे खरोखर महावसुली सरकार आहे अशा प्रकारचा संदेश लोकांमध्ये चालला आहे. यामुळे लोकांचा यावर विश्वास बसला असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यातील विषयांवर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न

राज्य सरकारमधील नेत्यांनी पहिल्यांदा त्यांच्यावर जे प्रकरणं सुरु आहेत त्याची उत्तरे त्यांनी दिली पाहिजे. एनसीबी, ड्रग्ज कारवाई याला प्रसिद्धी मिळते यामुळे त्यावर आघाडीतील नेते बोलत आहेत. पण महाराष्ट्रात १००० कोटीच्या दलालीवर तोंड बंद का आहेत? १९० कोटी रुपयांची कमाई सापडली यावर गप्प का? सॉफ्टवेयरने वसुली सुरु आहे त्यावर गप्प का? हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने चौकशी केल्यानंतर माजी गृहमंत्री फरार आहेत त्यावर गप्प का? याचा अर्थ असा आहे की राज्यात सुरु असलेल्या प्रकरणांचे लक्ष हटवायचे. संजय राऊत एकदाही शेतकऱ्यांबाबत बोलले का? नवाब मलिक बोले का? यांना माहिती आहे त्यावर बोललो तर आपण अडचणीत येऊ यामुळे हे लोकं त्या विषयांवर बोलत नाहीत असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -