महाराष्ट्राचे रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीसांच्या हाती

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस स्वत: या सरकारमध्ये नसतील, असेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे बाहेरून या सरकारचे काम सांभाळणार आहेत.

Eknath Shinde

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस स्वत: या सरकारमध्ये नसतील, असेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे बाहेरून या सरकारचे काम सांभाळणार आहेत. याआधी शिवसेना आणि भाजपाची युती असताना महाराष्ट्राचे रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती होते. तेच सर्व हक्क आता देवेद्र फडणवीस यांच्याकडे असतील. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार येणार आहे. (Devendra Fadnavis will handle shivsena and bjp government eknath shinde new cm of Maharashtra)

एकनाथ शिंदे आज संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार स्थापन होणार असून एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील. तेच आज पदाची शपथ घेतील आणि नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

एकनाथ शिंदे यांनी आज सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाही भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देवेद्र फडणवीसा यांनी एकनाश शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. तसेच, मी या सरकारमध्ये सहभागी नसीन असेही त्यांनी सांगितले.

शिवाय, “उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडले तर आम्ही पर्यायी सराकर देऊ. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, असे मी वारंवार सांगत होतो”, असे फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री, फडणवीस यांची घोषणा