घरताज्या घडामोडीफडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला - एकनाथ शिंदे

फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला – एकनाथ शिंदे

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आतापर्यंतच्या जर राज्यातील घटना आपण पाहिल्या तर आपण विरोधी पक्षातून राज्य सरकारच्या दिशेने जात असतो. मी देखील नगरविकास मंत्री होतो आणि अन्य मंत्री म्हणून या मंत्रिमंडळात काम करत होतो. परंतु राज्याच्या, हिताच्या, भविष्याच्या आणि विकासाच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही मंत्र्यांवर झालेल्या कारवाई असतील. तसेच महाविकास आघाडीमुळे हे निर्णय घेता येत नव्हते. आम्ही बाळासाहेबांची वैचारीक भूमिका पुढे घेऊन जातोय. परंतु यापूर्वी हे सगळं करायला पाहीजे होते. परंतु महाविकास आघाडीत काही मर्यादा आल्या असतील. पण हे सगळं होत असताना जवळपास ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात. तेव्हा त्याचा अर्थ किंवा त्यांची कारणं समजणं आवश्यक आहे, असं शिंदे म्हणाले.

आमदारांच्या मतदार संघातील अडचणी त्यांनी मला सांगितल्यानंतर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने मला यश मिळालं नाही. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. आज भारतीय जनता पक्षाकडे १२०चं संख्याबळ आहे. असं असताना देखील मुख्यमंत्रीपद तेही घेऊ शकले असते. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेंबाच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका तसेच आमदारांच्या मतदार संघातील विकास कामं आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, ती पूर्ण करू. जवळपास आम्ही ५० आमदार आजही एकत्र आहोत. तसेच एक वैचारिक भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आपल्या मतदार संघातील अडचणी असतील किंवा काही समस्या असतील. याबाबत वारंवार माहिती दिली. मी देखील त्यांच्यासोबत वांरवार चर्चा केली. आमची जी काही नैसर्गिक युती होती. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. आमदारांची नाराजी आणि मतदार संघातील प्रश्न किंबहुना पुढच्या निवडणुकीत येणारे प्रश्न हे सर्व लक्षात घेऊन आणि कोणाला काहीतरी पाहीजे. कोणाला काही मंत्रीपदं पाहीजेत. परंतु अशा प्रकारचा कोणताही स्वाद मनामध्ये नाही, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्राचे रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीसांच्या हाती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -