घरठाणेअब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता, डॉ. जितेंद्र आव्हाडांची टीका

अब्दुल सत्तार हा मनुवादाचा कट्टर पुरस्कर्ता, डॉ. जितेंद्र आव्हाडांची टीका

Subscribe

ठाणे: संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ठाण्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चप्पलांचा हार घालून तो जाळला. यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी, मनुवादाचा महाराष्ट्रातील कट्टर समर्थक अब्दुल सत्तार हेच आहेत. कारण, मनुवादामध्येच महिलांना स्थान आणि किमंत नाही. अन् तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो. त्या इस्लाममध्येही महिलांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे हा अब्दुल सत्तार इस्लाममध्येही नाही, अशी टीका डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना अत्यंत अश्लाघ्य अशी शिवीगाळ केली आहे. सत्तार यांच्या या शिविगाळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाणे पक्ष कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी सत्तार यांच्याविरोधात कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्तार ठाण्यात आले तर त्यांचे तोंड काळे करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

- Advertisement -

डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी अत्यंत नीच भाषेमध्ये टीका केली आहे. त्यांनी ‘भिकारचोट’ असा शब्द वापरला आहे. सत्तार यांनी काय शब्द वापरले आहेत; त्यांची संस्कृती काय आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला कळावे म्हणून आपण हा शब्द येथे वापरत आहोत. अब्दुल सत्तार हे ज्या शिव्यांच्या शाळेत आहेत ; त्या शाळेचे आम्ही सर्व मुख्याध्यापक आहोत. पण, सामाजिक जीवनात काम करीत असताना शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे आम्ही कधीच कोणाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत नाहीत. त्यांनी आमच्यावर तसे संस्कार केले आहेत.

आता त्याही पुढे जाऊन आम्ही सांगतो की, मनुवादाचा महाराष्ट्रातील कट्टर समर्थक अब्दुल सत्तार हेच आहेत. कारण, मनुवादामध्येच महिलांना स्थान आणि किमंत नाही. अन् तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो. त्या इस्लाममध्येही महिलांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे हा अब्दुल सत्तार इस्लामही नाही. वरिष्ठांना खूष करण्यासाठी सत्तार यांनी हे विधान केले आहे का, असे विचारले असता,  त्यांच्या वरिष्ठांनी आता ठरवावे की सत्तार यांचे काय करावे ते! आम्हाला त्यांच्या वरिष्ठांशी काही देणेघेणे नाही. मागच्या आठवड्यात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दारु पिता का, असे विचारले. यावरुन त्यांच्यावर कोणते संस्कार झाले आहेत, हे समजते. सिल्लोडमधून आपण काहीही करु शकतो, हा जो माज आलाय ना. तर त्यांनी सिंकंदरचे गाणे आठवावे. ‘जब गया था दुनियासे दोनो हाथ खाली थे! या जगात कोणाचाही माज चालत नाही. लोकशाहीत तर असा माज नक्कीच उतरविला जातो.

- Advertisement -

महाराष्ट्रातील तमाम महिला, मातांच्या हृदयाला हा शब्द भिडला आहे. असे नीच, संस्कृतीहीन वक्तव्य करणारा अब्दुल सत्तार हा इस्लाममध्येही नाही. काही महाभाग ,हिंदूत्वाचे खोटे पुरस्कर्ते असतील त्यांनी सत्तार याला हिंदू धर्मात घेत असतील तर त्याला आमची हरकत नाही. पण, महिलांना अपमानित करणे हे इस्लामलाही मान्य नाही, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

आयएएस अधिकार्‍यांच्या अपमानाची आयएएस संघटनेने गांभीर्याने नोंद घ्यावी

एका चर्चेत सहभागी झालले असताना जिल्हाधिकार्‍यांना चहा पिणार का, असे विचारल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी नाही, असे म्हटल्यावर ‘काय मग दारु पिता का’, अशी विचारणा केली होती. ही सत्तेची मग्रुरी व माज आहे. खरंतर अपेक्षा अशी होती की आएएस संघटना याची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना या बाबतचे निवेदन देईल. कारण, राज्यकर्ते हे पाहुणे असतात. पण, आयएएस हे कायमचे मंत्रालयात असतात. राज्य चालविण्यामागे त्यांचा मोठा सहभाग असतो. अशा एखाद्या दारु पिता का, हे विचारुन आयएएसचा अपमान करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. याची आयएएस अधिकार्‍यांनी गांभीर्याने नोंद घ्यायला हवी, असे आवाहन डॉ. आव्हाड यांनी केले.

वृत्त उघडकीस आणणार्‍या पत्रकारास धमक्या

अब्दुल सत्त्तार यांनी केलेले हे वक्तव्य उघडकीस आणणार्‍या पत्रकारास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोटही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला. हे वृत्त ज्या पत्रकाराने हे वृत्त प्रसारीत केले. त्याला बघून घेऊ, तुझा जीव घेऊ अशा धमक्या दिल्या जात असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.


हेही वाचा : सुप्रिया सुळेंबद्दलचं वक्तव्य चुकीचं, दीपक केसरकरांचा सत्तारांना घरचा आहेर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -