Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ओबीसी आरक्षण पे चर्चा

ओबीसी आरक्षण पे चर्चा

समता परिषदेच्यावतीने नाशिकमध्ये घेणार मेळावा

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाबाबत जनजनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली. आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, ओबीसींची जनगणना करणे या विविध न्याय मुद्यांवर ओबीसी समाजातील जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार तसेच ओबीसी समाजाच्या विविध पदांवर कार्यरत असलेल्या आजी माजी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेऊन ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, वार्ड व प्रभाग निहाय बैठका घेणार आहे. त्यानुसार शहर तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावातील चौका चौकात बैठका घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

- Advertisement -

यामाध्यमातून ओबीसी आरक्षणाबाबत सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यात येणार असून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी जिल्हाभरात जनजागृती करून सर्वपक्षीय नेत्यांची तसेच समाजबांधवांची एकत्रित मोट बांधणार आहे. तसेच नाशिक येथे ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ मेळावा आयोजित करणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ, विचारवंत यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येऊन त्यातून नागरिकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत जनजनजागृती करण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -