Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम दिराच्या कृत्याने भावजयी हादरली; सीसीटीव्ही फुटेज तपासणीवेळी केला विनयभंग

दिराच्या कृत्याने भावजयी हादरली; सीसीटीव्ही फुटेज तपासणीवेळी केला विनयभंग

Related Story

- Advertisement -

दिरानेच भावजयीचा दोनवेळा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कल्पेश रमेश पारख (४५, रा. तिरूपती बंगला, विकास कॉलनी, त्र्यंबकेश्वर रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी दुपारी त्र्यंबकरोडवरील विकास कॉलनी परिसरातील पीडित महिला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी डीव्हीआर रूममध्ये गेली होती. त्यावेळी संशयिताने खोलीत प्रवेश करून दरवाजा व लाईट बंद करून भावयीचा विनयभंग केला. पती व सासुच्या दबावामुळे तिने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मात्र, पुन्हा असाच प्रकार शनिवारी (दि.१९) दुपारी दोन वाजता घडला. महिला झोपली असताना दिराने पुन्हा तिचा विनयभंग केला. दिराचा छळ असहाय्य झाल्याने भावजयीने पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दिर कल्पेश पारखविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. बैसाणे करत आहेत.

- Advertisement -