घरताज्या घडामोडीनवनियुक्त कार्यकारिणीमुळे काँग्रेसमध्ये असंतोष

नवनियुक्त कार्यकारिणीमुळे काँग्रेसमध्ये असंतोष

Subscribe

स्वागताऐवजी झाली निषेध सभा : कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील कार्यकारिणीची घोषणा केली. मात्र, यात समाविष्ट केलेल्या नेत्यांमुळे जिल्ह्यात पुन्हा पक्षांतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करण्याएवेजी निषेध बैठक घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहीतीनूसार हा संघर्ष कमी करुन नवीन कार्यकारिणी ठरवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत गेल्याचे समजते. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील कार्यकारिणीत फेरबदल होण्याचे संकेत काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतलेल्या नाना पटोले यांच्या कार्य कार्यकारिणीला तब्बल सहा महिन्यांना मुहुर्त लागला. नाशिक जिल्हातून 11 नेत्यांना संधी मिळाली. मात्र या नियुक्तीवरून सध्या काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या पार्श्वभुमीवर मंगळवारी शहरातील एका काँग्रेस पदाधिकारयाच्या कार्यालयात या नियुक्ती विरोधात निषेध सभा घेण्यात आली. नवीन जाहीर करण्यात आलेल्या लोकांमध्ये काहींना तर कधी तरी बघितले तर काही तालुका पदाधिकारी म्हणून काम न केलेल्या लोकांना प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी दिली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले शिवाय संघटनेसाठी देखील घातक आहे.त्यामुळे तत्काळ निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या बैठकीला नाशिक शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक येथील कार्यालयात पार पडली त्यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र बागुल, उल्हास सातभाई, महाराष्ट्र काँग्रेस काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत, प्रदेश अनुसूचित सेलचे सुरेश मारू, माजी नगरसेवक रईस शेख, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकुर, प्रदेशचे माजी पदाधिकारी भारत टाकेकर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनिफ बशीर, अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे , युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील,मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, नाशिकरोड ब्लॉकचे अध्यक्ष दिनेश निकाळे, सिडको ब्लॉकचे अध्यक्ष विजय पाटील,पंचवटी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार,सातपूर ब्लॉकचे अध्यक्ष कैलास कडलग, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, युवक काँगेसचे माजी अध्यक्ष व माजी प्रदेश पदाधिकारी संदीप शर्मा, भरत पाटील युवक काँग्रेसचे जावेद पठाण,अभिजित राऊत, सचिन दिक्षित, सिध्दार्थ गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

यांची झाली निवड
प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना तर नाशिक ग्रामीणमधून माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांची नियुक्ती झाली आहे. माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना सरचिटणीसपदी कायम ठेवत डॉ. हेमलता पाटील यांना बढती देत त्यांनाही सरचिटणीसपदावर संधी दिली आहे. नगरसेवक राहुल दिवे व जिल्हा पदाधिकारी प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांना चिटणीसपदाची संधी मिळाली आहे. तसेच जिल्हा पदाधिकारी रमेश कहांडोळे, सुमित्रा बहिरम, भास्कर गुंजाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल पाटील यांची देखील सचिव म्हणून निवड झाली आहे. नांदगावचे माजी आमदार अ‍ॅड.अनिलकुमार आहेर यांना महत्वाच्या प्रदेश कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -