घरमहाराष्ट्रओमायक्रॉनमुळे प्रवासी मार्गदर्शक सूचना स्वत:चे वेगळे नियम लावू नका!

ओमायक्रॉनमुळे प्रवासी मार्गदर्शक सूचना स्वत:चे वेगळे नियम लावू नका!

Subscribe

केंद्राने राज्याला फटकारले

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे संपूर्ण देश दहशतीखाली आहे. त्यामुळे सर्वच राज्यांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्याने देखील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या. त्यावर स्वत:चे वेगळे नियम लावू नका, असे केंद्र सरकारने फटकारले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र लिहिले आहे. 30 नोव्हेंबर रोजी राज्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सवाल उपस्थित केले आहे.

राज्य सरकारने ३० नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या कोरोना निर्बंधांवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. राज्याने त्यांचे स्वतंत्र नियम लावू नये यामुळे देशभरात एकसारखे नियम लागू न होता प्रवाशांची गैरसोय होईल, असे केंद्राने म्हटले. राज्याचे नियम केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे राज्याने आपले नियम केंद्राच्या निर्देशाप्रमाणे करावेत. जेणेकरून देशभरात एकसारखे नियम लागू करता येतील. तसेच प्रवाशांची गैरसोय करणारे राज्याच्या नियमांमध्ये बदल करावेत.

- Advertisement -

विमानतळावर राज्यांतर्गत प्रवाशांकरता 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे. यापूर्वी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागत होते. मात्र, आता मुंबई विमानतळावर 72 तासांपर्यंतचा कोविड निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे सक्तीचे आहे. रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोविड टेस्ट केली जाणार आहे. यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार, साऊथ आफ्रिका, रिस्क कंट्रीमधून येणार्‍या प्रवाशांचे सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि त्यानंतर 14 दिवस होम आयसोलेशन असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -