घरताज्या घडामोडीकरोना व्हायरसच्या या मेसेजवर विश्वास ठेवू नका

करोना व्हायरसच्या या मेसेजवर विश्वास ठेवू नका

Subscribe

शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत, अशा आशयाचा मेजेस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना संदर्भात मोठा आदेश काढला आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांना नवा निर्णय लागू करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी दहा पेक्षा जास्त लोक जमू शकतात, अशा सर्व संस्था तात्पुरत्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत, अशा आशयाचा मेजेस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु अशा प्रकारच्या या आदेशावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खुलासा केला असून हा निर्णय अद्यापही घेतलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतेही अफवा पसरविणारे मेसेज पसरवू नका, असे आवाहन केले आहे.

WhatsApp Image 2020-03-13 at 19.47.13
करोना व्हायरसच्या या मेसेजवर विश्वास ठेवू नका

सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे ‘ते’ परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास जारी

कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -