Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम डॉ. कुरुलकर प्रकरणाचे नाशिक कनेक्शन? ATSकडून तपासाला वेग

डॉ. कुरुलकर प्रकरणाचे नाशिक कनेक्शन? ATSकडून तपासाला वेग

Subscribe

डॉ. कुरुलकर प्रकरणाचे धागेदोरे हे नाशिकपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आता नाशिकच्या एटीएस युनिटला दोन नंबर देण्यात आले आहे. या नंबरची तपासणी करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत.

हनी ट्रॅप प्रकरणात अडकून भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी DRDO चे संस्थापक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना दहशतवादविरोधी (ATS) पथकाकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा वेगाने तपास एटीएसकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करताना कुरुलकर यांच्या मोबाईलपासून ते सर्वच गोष्टींची तपासणी एटीएसकडून करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणाचे धागेदोरे हे नाशिकपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आता नाशिकच्या एटीएस युनिटला दोन नंबर देण्यात आले आहे. या नंबरची तपासणी करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. (Dr. Kurulkar Case Nashik Connection? Speed ​​up investigation by ATS) याआधी एटीएसने नागपूर येथील मोबाइल क्रमांकाद्वारे तपास केला होता, त्यावेळी या प्रकरणात बंगळुरू येथील हवाई दलाच्या अधिकाऱ्याचे नाव समोर आले. त्यामुळे आता नाशिकच्या नंबरमधून आणखी कोणती मोठी माहिती हाती लागते, याकडे एटीएस पथकाचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा – मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

- Advertisement -

honey trap प्रकरणी डॉ. कुरुलकर यांना एटीएसने अटक केली. यांच्या सोशल मीडियातून फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स् शेअर झाल्या आहेत. त्यांच्या मोबाईल आणि अन्य डिव्हाइसमधून डिलिट झालेला डेटा फॉरेन्सिक लॅबकडून पुन्हा प्राप्त झाला आहे. परदेश दौऱ्यावर असताना डॉ. कुरुलकर सहा देशात गेले होते, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या तपासात समोर आली होती. हवाई दलाचे अधिकारी शेंडे यांचे नावही डॉ. कुरुलकर यांच्या चौकशीत समोर आले होते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून DRDO चे अधिकारी असलेले डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर ते पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आले. ते पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील एका महिलेच्या संपर्कात देखील होते, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. त्यांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डीआरडीओच्या दक्षता विभागाकडून आणि गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरुलकर यांच्यावर नजर ठेवून होते. अखेरीस याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि DRDO मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ATSने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपी डॉ. कुरूलकर यांना अटक केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -