घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेच्या मदतीला ‘निन्जा यूएव्ही’ हायटेक ड्रोन; सुरक्षेत होणार वाढ!

मध्य रेल्वेच्या मदतीला ‘निन्जा यूएव्ही’ हायटेक ड्रोन; सुरक्षेत होणार वाढ!

Subscribe

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अलीकडेच दोन ‘निन्जा यूएव्ही’ हे हायटेक ड्रोन खरेदी केले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेत वाढ झाली असून मनुष्यबळाची बचत होणार आहे.

रेल्वे अपघात, रेल्वे सुरक्षा, रेल्वे मार्गावरील मालमत्ता यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अलीकडेच दोन ‘निन्जा यूएव्ही’ हे हायटेक ड्रोन खरेदी केले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेत वाढ झाली असून मनुष्यबळाची बचत होणार आहे. अलीकडेच रेल्वे यार्डमध्ये रेल्वेच्या कोच/वॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन चोरट्यांना या ड्रोनच्या माध्यमातून वाडीबंदर यार्ड आणि कळंबोली येथे पकडण्यात आले. त्यामुळे या ड्रोनची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.

  रेल्वेच्या हालचालीवर असणार नजर

रेल्वे परिक्षेत्र, रेल्वे ट्रॅक विभाग, यार्ड, कार्यशाळा इत्यादी रेल्वे क्षेत्रात चांगली सुरक्षा व पाळत ठेवण्यासाठी मुंबई विभागाने या दोन निन्जा यूएव्ही हे ड्रोन खरेदी केले आहेत. हे ड्रोन उडविण्यासाठी आरपीएफच्या मॉडर्नरायझेशन सेलमधील चार कर्मचार्‍यांच्या पथकाला तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या ड्रोनला उड्डाण करण्यासाठी रितसर परवानगी सुद्धा मिळाली आहे. या ड्रोनमुळे संपूर्ण रेल्वे मालमत्ता, क्षेत्राची संवेदनशीलता, गुन्हेगारांचे क्रियाकलाप इत्यादींवर आधारित केले गेले आहे. ड्रोन आय इन द स्काय म्हणून काम करते आणि संपूर्ण क्षेत्रावर नजर ठेवते. कोणतेही संशयास्पद क्रियाकलाप लक्षात आल्यास गुन्हेगाराला लाइव्ह पकडण्यासाठी विभागातील जवळच्या आरपीएफ पोस्टवर माहिती दिली जाते. अशा दोन गुन्हेगारांना रिअल टाईम आधारावर वाडीबंदर यार्ड परिसरात आणि दुसरे कळंबोली प्रांगणात पकडण्यात आले. ते यार्डमध्ये रेल्वेच्या कोच/वॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते.

- Advertisement -

ड्रोनचे वैशिष्ठ्य

या निन्जा यूएव्ही ड्रोनची परिचालन मर्यादा २ किलोमिटर इतकी आहे आणि २५ मिनिटांपर्यंत उड्डाण करते. त्याचे टेक ऑफ वजन २ किलोपर्यंत आहे आणि दिवसाच्या उजेडात १२८०x७२० पिक्सेल वर एचडी प्रतिमा कॅप्चर करू शकतात. यात रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडिओ प्रवाह आणि स्वयंचलित अपयश-सुरक्षा मोड देखील आहे.

- Advertisement -

रेल्वेची सुरक्षा वाढणार

या दोन ड्रोनमुळे रेल्वे मालमत्तेची तपासणी आणि यार्ड्स, वर्कशॉप्स, कार शेड्स इत्यादींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तसेच रेल्वे परिसरातील गुन्हेगारी आणि असामाजिक बाबींवर पाळत ठेवता येणार आहे. रेल्वे गाड्यांच्या सुरक्षित संचालनासाठी असुरक्षित/धोकादायक विभागांचे विश्लेषण, आपत्ती साइटवर इतर एजन्सींसह समन्वय साधण्यासाठी, रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठ,ी रेल्वे मालमत्तेचे मॅपिंग आणि गंभीर परिस्थितींमध्ये, सणासुदीच्या काळात गर्दीचे निरीक्षण करण्यासाठी या ड्रोनचा उपयोग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -