घरताज्या घडामोडीअखेर मुहूर्त ठरला; चांदणी चौकातील पूल पाडणार, वाहतूक 9 तास राहणार बंद

अखेर मुहूर्त ठरला; चांदणी चौकातील पूल पाडणार, वाहतूक 9 तास राहणार बंद

Subscribe

अखेर पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्याचा मुहूर्त ठरला. 1 ऑक्टोबर शनिवारी मध्यरात्री 2 वाजता पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 9 तास चांदणी चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

अखेर पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्याचा मुहूर्त ठरला. 1 ऑक्टोबर शनिवारी मध्यरात्री 2 वाजता पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 9 तास चांदणी चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतुकीला पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. (due to flyover demolition work at chandni chowk change in traffic mumbai bengaluru highway)

चांदणी चौकातील पूल केवळ 5 सेकंदात पाडण्यात येणार आहे. मात्र, पूल पाडल्यानंतर पूलाचा राडारोडा काढण्यासाठी या मार्गावरची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक वळवण्यात आली आहे.

- Advertisement -

चांदणी चौकातील पूल पाडण्यात येणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मुंबईकडून येणारी जड वाहने ही तळेगाव दाभाडे येथील टोल नाक्याच्या अलीकडे थांबवली जाणार आहे. तर साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक खेड-शिवापूर परिसरात थांबविली जाणार आहे. तर हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहे.

वाहतूक मार्गातील बदल

  • साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना जुन्या बोगद्यामार्गे कात्रज-स्वारगेट-टिळक चौक-शिवाजीनगर-विद्यापीठ चौकातून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून थेट महामार्गावर मुंबईच्या दिशेने या वाहनांना जाता येणार आहे.
  • साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना दुसरा पर्यायी रस्ता हा नवले पूल, वडगाव पूल, सिंहगड रस्ता, राजाराम पूल, स्वर्गीय राजा मंत्री पथावरून (डीपी रस्ता), नळस्टॉप, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे असा असणार आहे.
  • साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना तिसरा पर्यायी रस्ता वारजे पूल, कर्वे रस्त्याने आंबेडकर चौक, वनदेवी, कर्वे पूतळा चौक, पौड फाटा, विधि महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे असा असणार आहे.
  • मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी हलकी वाहने जून्या पुणे-मुंबई टोल नका, सोमाटणे फाटा, देहू रोड, भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, खडकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्ता, कात्रज चौक मार्गे साताऱ्या जातील.
  • मुंबईवरून वाकड येथे आल्यानंतर राजीव गांधी पूलावरून औंध, आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील चौक), संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्त्यावरून ते सातारा येथे जटिल.
  • मुंबईवरून बाणेर येथे आल्यानंतर विद्यापीठ चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि स्वारगेटवरून सातारा रस्त्यावरून साताऱ्याकडे प्रवाशांना जाता येणार आहे.
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -