दिलासादायक! पुण्यात २६ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द

पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात पाणी कपातीचा निर्णय २६ जुलैपर्यंत रद्द करण्यात आला आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Rainfall is higher in suburbs than in Mumbai cities and increasing water storage
मुंबईत शहरापेक्षा उपनगरांत पावसाचे प्रमाण जास्त, पाण्याच्या साठ्यात वाढ

पुणेकरांसाठी (Pune) एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात पाणी कपातीचा (Pune Water Cut) निर्णय २६ जुलैपर्यंत रद्द करण्यात आला आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी अखेर पुण्यातील पाणी कपात २६ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. याआधी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. (due to heavy rainfall restricted water supply is cancelled in pune)

पुण्यातील धरणसाखळीत पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुणेकरांना २६ जुलैपर्यंत पुणेकरांना दररोज पाणीपुरवठा (Water supply) करण्यात येणार आहे. जूनमध्ये राज्यात पावसाला सुरूवात झाली असली तरी काही भागात, तलावातील पाणीसाठा घटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. पुणे महानगरपालिकेला पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. पावसाने दडी मारल्यानं महापालिकेने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात ४ जुलैपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले होते.

४ तारखेपासून ११ तारखेपर्यंत एक दिवसाआडच पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचेही आवाहनही करण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात मुंबईसह पुणे आणि महत्त्वाच्या शहरांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यातील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाणी प्रश्न निकाली निघण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि परिसरात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. घाट माथ्यासह शहर व परिसराला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. पुण्यात १४ जुलैपर्यंत शहरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू असून, रविवारी दुपारनंतर शहरातील सर्व भागांत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे जूनमध्ये अवघ्या ३४ मिमीवर असणार्‍या हंगामातील पावसाने १५० मिमीचा टप्पा रविवारी पार केल्याची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – गडचिरोली जिल्ह्यात ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन