अंधेरी-जोगेश्वरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेचीही वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते जोगेश्वरी स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.

technical glitch disrupted the fast local service to churchgate mumbai

मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेचीही वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते जोगेश्वरी स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन कामाच्या वेळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सहन करावा लागत आहे. (due to technical issue at western railway line running late)

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते जोगेश्वरी स्थानकादरम्यानच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. बुधवारी  सकाळच्या सुमारास या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल एकामागोमाग एक उभ्या असल्याचे समजते. लोकल एकाच ठिकाणी थांबल्याने प्रवाशी लोकलमधून उतरून रुळावर चालत आहेत.

बुधवारी सकाळी ऐन कामाच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशाची गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. स्थानकात वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरूस्तीसाठी घटनास्थळी धाव घेतली. सध्या रेल्वेचे कर्मचारी तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली. कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. विशेषत: अप मार्गावरील अनेक लोकल ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशीरा धावल्याने हा सगळा घोळ निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा