घरमहाराष्ट्रशिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी छापा टाकला. सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. १२ जणांच्या पथकाकडून सकाळी साडेआठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे.

औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याचं समजतेय. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. जमिनीची रेडीरेकनर व्हॅल्यू ७० कोटी रुपये असताना व्हॅल्यूअरला मॅनेज करून संपूर्ण कारखान्याची लँड, प्लॉट, आणि मशिनरी प्राईस फक्त ४२ कोटी ठेवण्यात आली. महाराष्ट्र सरकारचे शंभर एकर जमीन एमएससी बँकेकडे नसतानासुद्धा विकण्यासाठी काढली, खोतकर यांच्या संबंधित तीन कंपन्यांनी यासाठी टेंडर भरले. तसंच, औरंगाबादमध्ये छापा टाकण्यात आलेल्या एका उद्योजकाचे आणि व्यावसायिकाचे खोतकर यांच्यशी साखर कारखान्याच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. रंगाबादमधील एका उद्योजकाने ४३ कोटींचा कारखाना अर्जुन खोतकर यांच्या अर्जुन सीडस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला २७.५८ कोटी रुपयांना विकला, असं सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान,अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत, मालक नाही, असं स्पष्टीकरण खोतकर यांनी दिलं होतं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -