घरक्राइमED : अनिल देसाईंचे पीए दिनेश बोभाटेंना ईडीचे समन्स, बेहिशेबी मालमत्ताप्रकरण

ED : अनिल देसाईंचे पीए दिनेश बोभाटेंना ईडीचे समन्स, बेहिशेबी मालमत्ताप्रकरण

Subscribe

मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे पीए दिनेश बोभाटे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहेत. मिळकतीपेक्षा 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप दिनेश बोभाटे यांच्यावर आहे. दिनेश बोभाटे एका इन्शुरन्स कंपनीमध्ये सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी ही बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – Pune Crime News: पुण्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; कारण ऐकून थक्क व्हाल

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच दिनेश बोभाटे यांना या आठवड्यात चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आल्याने ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिनेश बोभाटे यांनी जवळपास 2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा दावा ईडीने केला आहे.

- Advertisement -

याआधी सीबाआयने दिनेश बोभाटे यांच्याविरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. 2013 ते 2023 या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत असताना त्यांनी जवळपास 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने याप्रकरणी दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ ईडीने दिनेश बोभाटे यांच्याविरुद्ध मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. आता त्यांना या आठवड्यात ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.

ठाकरे गटाचे अनेक नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर

उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, आमदार राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad : हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान, आव्हाडांचा सातपुतेंवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -