घरक्राइमPune Crime News: पुण्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; कारण ऐकून...

Pune Crime News: पुण्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; कारण ऐकून थक्क व्हाल

Subscribe

पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका तरुणाचा दगड घालून खून करण्यात आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात हा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. बसवराज गजेंत्रे (वय 26, मार्केटयार्ड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. (Pune Crime News A youth was killed by a stone on his head in Pune You will be surprised to hear the reason)

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अनेक दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तेथील एका गाळ्यामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

- Advertisement -

त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी त्या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले. बसवराज चिदानंद गजंत्रे असं या मृत तरुणाचं नाव आहे. त्याने नातेवाईकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरले होते. तो वाईटसाईट बोलला होता, यामुळेच वाद झाला आणि संशयित आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगड घालून मारहाण केली.

मारहाणीतस बसवराज हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. एका संशयिताला ताब्यातही घेण्यात आलं आहे.

- Advertisement -

अहमदनगरमधील घटना

अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीसह मुलींना जिवंत जाळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुनील लांडगे असं आरोपीचं नाव आहे. मृत पत्नीचं नाव लीलाबाई लांडगे आहे. साक्षी लांडगे आणि खुशी लांडगे या दोन मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

(हेही वाचा: Drugs Factory : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, सांगलीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -