घरताज्या घडामोडीपहिल्यांदाच खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा!

पहिल्यांदाच खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा!

Subscribe

भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

एकीकडे महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या तिनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या नाराजीवर जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांनी आत्तापर्यंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. मात्र आता पहिल्यांदाच एकनाथ खडसेंनी या दोघांची नावं घेऊन थेट त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे भाजपचा हा अंतर्गत वाद आता उघड चव्हाट्यावर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता पक्षाच्या केंद्रीय नतृत्वाकडून काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ खडसेंनी ही टीका केली आहे.

‘मला संपवण्याचा डाव’

यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन टीका केली. ‘नाथाभाऊंना जाणीवपूर्वक राजकारणातून संपवण्याचा हा डाव आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांनी कोअर ग्रुपमध्ये मला तिकीट देण्यावर नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती मला दिल्लीला मिळाली आहे. मी वारंवार विचारलं की माझा नक्की काय गुन्हा आहे. पण मला काहीही सांगितलं गेलं नाही. माझं समाधान होऊ शकलं नाही. त्यामुळे मला संपवण्याचा त्यांचा डाव आहे’, असं एकनाथ खडसे म्हणाले.

- Advertisement -

‘कोअर टीममधल्याच सदस्यांनी सांगितलं’

दरम्यान, कोअर टीममधल्याच काही मित्र सदस्यांनी हा खुलासा आपल्याकडे केल्याचं खडसे यावेळी म्हणाले. ‘मला कोअर टीममधल्या बहुतांश सदस्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू नये, यासाठी आग्रह धरला होता असं सांगितलं आहे. आणि असं असेल, तर ते दुर्देवी आहे. मला तिकीट न दिल्यामुळे माझ्यासोबतच अजून १० ते १२ जागांचं नुकसान झालं आहे. एखाद्या व्यक्तीच्या हट्टासाठी निवडणुकांमध्ये पक्षाचं नुकसान झालं’, असं त्यांनी नमूद केलं. तसेच, ‘सध्या मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे’, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -