घरताज्या घडामोडीशिंदे सरकारमध्ये मंत्रीपदावरुन रस्सीखेच, ६ आमदारांमागे १ मंत्रीपद

शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदावरुन रस्सीखेच, ६ आमदारांमागे १ मंत्रीपद

Subscribe

भाजप आणि शिंदे गटामध्ये पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. सरकारमध्ये काम करताना संघटना वाढवण्याचेसुद्धा आव्हान दोघांना आहे. यामुळे महत्त्वाचे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा काही दिवसांमध्येच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सत्तेत येण्यापूर्वीच मंत्रीपद वाटाघाटीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु मंत्रीपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. तसेच पालकमंत्री पदावरुनसुद्धा चढाओढ सुरु झाली असल्याची चर्चा आहे. जळगाव, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी प्रत्येकी दोन-दोन नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कोणाला मंत्रीपदाची जबाबदारी मिळते हे पाहणं महत्त्वाच आहे. ६ आमदारांमागे १ मंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला ठरला असल्यामुळे अनेक आमदार नाराज आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. तसेच शिंदे गटामध्ये ५० आमदार आहेत. यामध्ये २९ मंत्रीपदे भाजपला तर १३ मंत्रीपद शिंदे गटाला देण्यात येणार आहेत. परंतु कोणती खाती आणि महामंडळ भेटणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने भाजप काही महत्त्वाची खाती घेऊ शकते. शिंदे गट आणि भाजपला संघटना वाढवण्यासाठी काही महत्त्वाची खाती आणि जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. शिंदे गटामध्ये अधिक आमदार आहेत. जर कमी मंत्रीपद मिळाले तर अनेक आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री अशी १३ मंत्रीपदे देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

भाजप गृहविभाग, नगरविकास, सहकार, सार्वजनिक बांधकाम खाती घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेकडे एकूण १५ खाती होती. परंतु आता शिंदे गटाला केवळ १३ मंत्रीपदे देण्यात येणार आहेत. शिंदे गटातील ४० आमदारांपैकी महत्त्वाच्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांना पुन्हा मंत्रीपदाची जबाबदारी मिळणार आहे. परंतु जे उरलेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांनी अपक्ष आमदारांना भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. मंत्रीपदाच्या वाटपामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार काहीसा लांबला आहे. ११ जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार होता परंतु हा विस्तार १३ जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटात कोणाला मिळणार संधी?

शिंदे गटात महाविकास आघाडीच्या काळातील ७ मंत्री होते. यामुळे या माजी मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. परंतु त्यांच्याकडे दुसऱ्या खात्याची जबाबदारी असेल. दादा भुसे, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बच्चू कडू, दीपक केसरकर, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, तानाजी सावंत या आमदारांना मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. ६ आमदारांमागे १ मंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला ठरला असल्यामुळे अनेक आमदार नाराज आहेत.

- Advertisement -

मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेली मंत्रीपदे शिंदे गटाला देण्याचा विचार भाजपने केला आहे. भाजपने २९ मंत्रीपदे घेतली असून यातील बहुतांश मंत्रीपदे महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे होती. शिवसेनेकडे असलेली मंत्रीपदे शिंदे गटाला देऊन राष्ट्रवादीकडे असलेली गृह, महसूल आणि अर्थ अशी मंत्रीपदे भाजपकडे घेण्याचा आग्रह फडणवीसांचा आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार करण्याचा योग लांबला आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. याविरोधा शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै रोजी या प्रकरणात सुनावणी होणार आहे. निकाल लागल्यानंतर १३ जुलैपर्यंत मंत्रीपदाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

संघटना वाढवण्यासाठी पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच

भाजप आणि शिंदे गटामध्ये पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. सरकारमध्ये काम करताना संघटना वाढवण्याचेसुद्धा आव्हान दोघांना आहे. यामुळे महत्त्वाचे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगले बळ मिळावे यासाठी तिकडचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी भाजप आग्रही दिसत आहे. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी शिंदे गटाचा आग्रह आहे. जळगावचे पालकमंत्रीपद महाविकास आघाडी सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडे होते. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपदसुद्धा शिवसेनेकडे होते. उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. सिंधुदुर्गमध्ये भाजपच्या नितेश राणेंना पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. तर शिंदे गटाकडून उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचे नाव चर्चेत आहे. तर कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पालकमंत्री पद आपल्याला मिळावे यासाठी भाजप आणि शिंदे गट प्रयत्न करत आहे.


हेही वाचा : माझ्या कारकिर्दीचे श्रेय कर्मचाऱ्यांनाच – जितेंद्र आव्हाड 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -