Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुंबईत वादळी पाऊस, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मुंबईत वादळी पाऊस, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

Subscribe

राज्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मागील चार दिवसांपासून राज्यात कोसळधार पाऊस पडत आहे. सकाळी काही काळं पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु मुंबईसह उपनगरांत पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनवर त्याचा परिणाम झाला आहे. सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळित असून पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे. मात्र, मुंबईत तुफान पाऊस पडत असल्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबईतल पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ जुलै आणि ८ जुलै रोजी मुंबईत हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले.

- Advertisement -

मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आजची परिस्तिथी पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा प्रकारचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असलेल्या पाच हजार सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यपरिस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. जुलैच्या सुरूवातीला राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच खबरदारीचा इशारा म्हणून महाराष्ट्रातील विविध भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


- Advertisement -

हेही वाचा : झारखंडमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, डझनभर मजुर जमिनीखाली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -