घरताज्या घडामोडीरिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.., एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.., एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावला आहे. आज त्यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठकी घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट होती, ब्रेकच लागत नव्हता, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. मात्र, ट्विटच्या माध्यमातून एकनाथ शिदेंनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीट केलं असून ते म्हणाले की, रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार, असं ट्विट एकनाथ शिंदेंनी करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विधानपरिषदेत दोन्ही जागा जिंकून येतील असं म्हणत होते, आले देखील निवडून. पण १२ मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग यांचं कटकारस्थान कधीपासून सुरू होतं, काल ते विधानसभेत गुपीत खुललं. उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते थांबा, थांबा…गाडीचा ब्रेक फेल झालेला, गाडी थांबते कशाला…रिक्षाचा ब्रेक फेल…त्यावेळेला तीन चाकी सरकार बोलायचे आता तीन चाकी चालवणारा त्यांचा ड्रायव्हर…आता चालवा सरकार, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

- Advertisement -

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिंदे गट-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेत या सरकारवर टीकास्त्र सोडताना पहायला मिळत आहे. मात्र, हे सर्व सामान्यांचं सरकार असून बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत, असचं वक्तव्य हे एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे.


हेही वाचा : …तर कोणी हरामखोरी केली नसती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -