Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र वीजबिल थकबाकीमुळे भांडूपमध्ये ८० हजार ७४८ ग्राहकांचा वीजपुरवठा केला खंडित

वीजबिल थकबाकीमुळे भांडूपमध्ये ८० हजार ७४८ ग्राहकांचा वीजपुरवठा केला खंडित

थकबाकीच्या ओझ्यामुळे वीजखरेदीसह दैनंदिन देखभाल व इतर खर्चासाठी मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून नाईलाजास्तव महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, चांगली व दर्जेदार वीजसेवा ग्राहकांना पुरविण्यासाठी महावितरणची कसरत सुरु असते. मागील २ वर्षापासून कोरोना काळातही उत्तम सेवा देऊन महावितरणने आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ सारख्या परिस्थितीत सुद्धा अहोरात्र काम करून ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. महावितरणच्या अनेक ग्राहकांनी कोरोना काळातील आपले वीजबिल भरले नाहीत. भांडूप परिमंडलातील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची वीजबिलाची थकबाकी रु. ९२३ कोटींवर पोहोचली असून ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. महावितरण भांडूप परिमंडलातील वीजबिल थकबाकीमुळे ८०,७४८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे.
भांडूप परिमंडलात आजपर्यंत ८० हजार ७४८ घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा रु. ६१.८५ कोटी थकबाकी असल्यामुळे खंडित करण्यात आले आहे. यामध्ये, वाशी मंडळातील नेरूळ विभागात ३,८४३ ग्राहकांची थकबाकी ३.७९ कोटी, पनवेल शहर विभागातील १४,४०१ ग्राहकांची थकबाकी १३.४४ कोटी तर वाशी विभागातील ७२३६ ग्राहकांची थकबाकी ७.६८ कोटी असून त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ठाणे मंडळातील भांडूप विभागात ४,९८३ ग्राहकांची थकबाकी रु. ३.६८ कोटी आहे, मुलुंड विभागातील २,९८५ ग्राहकांची थकबाकी १.६८ कोटी, ठाणे १ विभातील ३,२२८ ग्राहकांची थकबाकी १.७९ कोटी, ठाणे २ विभागातील ३,८२५ ग्राहकांची थकबाकी २.९७ कोटी तर वागळे ईस्टेट विभागातील ७,०६७ ग्राहकांची थकबाकी ६.१५ कोटी एवढी आहे. पेण मंडळातील अलिबाग विभागात ५,७४५ ग्राहकांची थकबाकी ३.४४ कोटी, गोरेगाव विभागातील ६३१८ ग्राहकांची थकबाकी ३.६३ कोटी, तर पनवेल ग्रामीण विभागातील १३,७६५ ग्राहकांची थकबाकी १०.१४ कोटी तसेच रोहा विभागातील ७,३५२ ग्राहकांची ३.४२ कोटी थकबाकीचा समावेश आहे.
थकबाकीच्या ओझ्यामुळे वीजखरेदीसह दैनंदिन देखभाल व इतर खर्चासाठी मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून नाईलाजास्तव महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला सुरवात करण्यात आली आहे. विशेषतः ज्या ग्राहकांनी एप्रिल २०२० पासून वीजबिलाचे एकही रुपये भरले नाहीत, त्यांनी आपले चालू व थकीत वीजबिल भरावे अन्यथा यापुढे कारवाई अजून तीव्र करण्याचा इशारा भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.गणेशकर यांनी दिला आहे. तसेच, शेजाऱ्याकडून अथवा परस्पर वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे ही श्री. सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना सांगितले.
ग्राहकांच्या सोयीसाठी सध्या सुट्टीच्या दिवशीही सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्राहक डीजीटल माध्यमाचा वापर करूनही घरबसल्या आपले वीजबिल www.mahadiscom.in किंवा महावितरणच्या मोबाईल एपद्वारे भरू शकतात.हे हि वाचा – शरद पवार दीड महिन्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, अर्धातास खलबतं- Advertisement -

 

- Advertisement -