Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'या' प्रसिद्ध कलाकारांनी पॅपराजी कल्चरपासून ठेवलयं मुलांना दूर

‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी पॅपराजी कल्चरपासून ठेवलयं मुलांना दूर

कलाकार कॅमेराची नजर चुकवत तसेच माध्यमांना विनंती करत त्यांच्या मुलांना पॅपराजी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Related Story

- Advertisement -

कलाकारांच्या खाजगी आयुष्यात काय घडतयं याची माहिती प्रत्येक लोकांना हवी असते. आपल्या आवडत्या स्टारने कोणते व कसे कपडे घातले आहेत इथपासून ते त्यांच्या घरामोर उभी असलेली गाडी कोणत्या लक्जरी ब्रॉन्ड आहे. याची इंत्यभूत माहिती  चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या डिजीटल युगात सोशल मीडिया हे चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी तसेच चित्रपट प्रमोशन करण्यासठी कलाकारांसाठी तगडं माध्यम मानलं जात. अशातच अनेकदा सोशल मीडियाच्या वाढत्या गर्दीमुळे कलाकारांना ट्रोल होण्याची देखील वेळ येते. कलाकारांच्या खाजगी आयुष्यातील घडामोडी वाऱ्याच्या वेगाने तुफान व्हायरल होतात. यामुळे कलाकारांनी आता त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सोशल मीडिया तसेच पॅपराझी कल्चर पासून दूर ठेवल्याचे पाहायला मिळते. यापैकीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार सध्या त्यांच्या बाळाचे फोटो,गरोजर असल्याची बातमी लपवून ठेवतात. अनेक बॉलिवूड कलाकार कॅमेराची नजर चुकवत तसेच माध्यमांना विनंती करत त्यांच्या मुलांना पॅपराजी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Kareena Kapoor says Taimur Ali Khan has the most fun with her and Saif Ali  Khan
अभिनेत्री करीना आणि सैफ अली खान यांचा पहिला मुलगा तैमुरच्या जन्मानंतर सैफ-करीनच्या घराभोवती दिसवरात्र कॅमेरा मॅनचा घोळका दिसायचा. यामुळे करीना-सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा देखील लोकांना दाखवला नाहीये.

- Advertisement -

Anushka Sharma-Virat Kohli Introduce Daughter Vamika: Twitter Reacts to Her  First Picture

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी वामिका नुकतीच 6 महिन्यांची झाली आहे. विरुष्काने जोपर्यंत वामिकाला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही तोपर्यंत वामिकाला आम्ही पॅपराजी तसेच सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगितलं आहे.

- Advertisement -

Bachchan Family Health Update: after amitabh bachchan aishwarya rai  bachchan and her daughter aradhya admitted in nanavati hospital - Bachchan  Family Health Update: ऐश्वर्या राय और उनकी बेटी आराध्या नानावटी ...

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या प्रेग्नंसीच्या न्यूज मुळे सर्वजन चकीत झाले होते. ऐश्वर्याने तिच्या सोबत काम करत असणाऱ्या दिग्दर्शकांना सुद्धा गरोदर असल्याचं कळवलं नव्हते. ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या मुलीला म्हणजेच आराध्याला नेहमीच माध्यमांपासून दूर ठेवतात.

First pic of Amrita Rao and RJ Anmol's son Veer. See post - Movies News

विवाह या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता रावने जवळ-जवळ नवव्या महिन्यात गरोदर असल्याचे जाहिर केले होते. तिने काही दिवसातच एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.

Kylie Jenner On Plans For a Second Child and Her Relationship With Travis  Scott | InStyle
हॉलिवूड मधील प्रसिद्ध चेहरा कायली जेनर तसेच रॅपर ट्राविस स्कॉट दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात पण कायलीने तिच्या गरोदरपणा बद्दला कोणालाही सांगितले नाही. मुलीचा जन्म झाल्यानंतर कायलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिला मुलगी झाली असल्याचे सांगितले. तसेच कायलीच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी पॅपराजीने चक्क हॅलिकॉप्टर बूक करुन फोटो कढण्याचा प्रयत्न केला होता.हे हि वाचा- अभिनेत्री करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप 

- Advertisement -