घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाचा एल्गार

लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाचा एल्गार

Subscribe

लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी समाज उतरला रस्त्यावर

नाशिक : श्रद्धा वालकर या मुलीच्या घृणास्पद मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेविरोधात सोमवारी रस्त्यावर उतरत लव्ह जिहाद विरोधात देशभरात कठोर कायदा लागू करण्याची मागणी करत सकल हिंदू समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी हिदुं बांधवांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला.

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्ष, संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आफताबने दिल्ली येथे श्रद्धा वालकर हीचे 35 तुकडे करत निर्घुणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचा प्रत्यय नाशिकमधून काढण्यात आलेल्या या मोर्चातून दिसून आले. यामध्ये ’36 गुण जुळतील म्हणून ती त्याच्यासोबत गेली, पण जाता जाता स्वतःच्या आयुष्याचे 36 तुकडे करून गेली, आपल्या आयुष्यात एखादा आफताब येऊन आपली श्रद्धा होईल एवढं प्रेमाच्या आहारी जाण योग्य नाही’, अशा आशयाचे फलक महिलांच्या हातात दिसून आले.

- Advertisement -

लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर, संघटनेवर, राजकीय पक्षावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागण्या सकल हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चादरम्यान करण्यात आल्या आहेत. मोर्चानंतर अठरा पगड जातीच्या प्रतिनिधींमार्फत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात हिंदु बांधव, शहरातील विविध हिंदु संघटना, साधू महंत तसेच शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -