घरताज्या घडामोडीमहागाईविरोधात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा एल्गार

महागाईविरोधात राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा एल्गार

Subscribe

विभागीय मेळाव्यात ठरणार भूमिका, नागरी समस्या जाणून घेणार

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा उत्तर महाराष्ट्र मेळावा शुक्रवार (दि.८) राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे आयोजित करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांनी सांगितले.

मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजीत या मेळाव्यात सामाजिक न्यायचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.जयदेव गायकवाड व प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे मार्गदर्शन करणार आहे. आगामी नाशिक महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान, विभागातील समस्या, अडीअडचणी या विषयावर या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. सध्या देशात सर्वत्र महागाईने जनता त्रस्त आहे. वाढती महागाई, इंधनाच्या दररोज वाढणार्‍या किंमती याबाबत सामाजिक न्याय विभागाच्या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या पाच जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांनी सांगितले.

- Advertisement -

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पक्षाची सदस्य नोंदणी अभियान, विभागातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्याकामी पाठपुरावा करणे आदी विषयांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे.
धनंजय निकाळे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -