घर महाराष्ट्र कोल्हापूरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली शाळेची तोडफोड

कोल्हापूरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली शाळेची तोडफोड

Subscribe

शाळा प्रशासनाने नविन बिल्डिंग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बिल्डिंगसाठी विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडे फीची सक्ती केली जात असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

कोल्हापूरमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेची तोडफोड केली आहे. कोल्हापूर शहरामध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या होली क्रॉस शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. या शाळा प्रशासनाने नवीन बिल्डिंग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बिल्डिंगसाठी विद्यार्थ्यांमार्फत पालकांकडे फीची सक्ती केली जात असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. आज दुपारी अचानक शाळेमध्ये जाऊन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

कोल्हापूर येथील होलीक्रोस शाळेत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

कोल्हापूर येथील होलीक्रोस शाळेत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. इमारतीच्या फी साठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येत होती

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, January 22, 2019

- Advertisement -

शाळेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शाळेच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबलची तोडफोड करण्यात आली आहे. मात्र, शाळेमध्ये पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्यामुळे तणाव निवळला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र शाळा प्रशासनाने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आरोप फेटाळला आहे. फीची सक्ती नसून आवाहन केले आहे. इच्छुक असणाऱ्यांनी ती द्यावी, असं शाळा प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी शाळा प्रशासनाने केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -