exam paper leak : आरोग्यभरती पेपर फुटीला न्यासा कंपनी जबाबदार, दोघांना अटक; पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

exam paper leak nyasa officer involved in health department recruitment exam paper leak says pune police
exam paper leak : आरोग्यभरती पेपर फुटीला न्यासा कंपनी जबाबदार, दोघांना अटक, पुणे पोलीस आयुक्त

आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा कंपनी जबाबदार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी आत्तापर्यंत दोन संशयित आरोपींविरोधात कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पुणे पोलिसांनी आज या पेपरफुटी प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य भरती परीक्षेतही घोटाळा झाल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या न्यासाच्या अधिकार्‍यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

म्हाडा पेपर फुटीच्या आधीच एका टोळीला अटक करण्यात आली. या टोळीमधील पेपर सेट करणाऱ्या कंपन्याच्या डायरेक्टरला अटक करण्यात आली. आरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे दोन परीक्षांविरोधात गुन्हा दाखल केला. या चार परीक्षांसंदर्भातील तक्रारीनंतर जवळपास २६ आरोपींना अटक केली. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज दिली आहे.

तसेच २४ ऑक्टोबरला झालेल्या आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. असेही पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. याप्रकरणातही तक्रार दाखल करत दोघांना अटक केली आहे. याशिवाय गट ड चा पेपर न्यासाचे अधिकारी बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्य़मातून फुटला. दोघेही एकमेकांशी संबंधित होते याचा तपास सुरु आहे. मात्र आरोग्य विभागाचा गट क चा पेपर फुटीत न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी दोन दलालांना अटक केली आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता य़ांनी दिली आहे.

असा फुटला परीक्षेचा पेपर

या एका पेपरसाठी दलालाने जवळपास ५०० उमेदवारांकडून ५ ते ८ लाख रुपयांचा सौदा निश्चित केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे. न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. न्यासाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.


Video : १५ लाखांच्यावर भ्रष्टाचार झाल्यास तक्रार करु नका, तर… भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य