घरमहाराष्ट्रनितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणात एडलवाईजवर गंभीर आरोप, कंपनीने दिले स्पष्टीकरण

नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणात एडलवाईजवर गंभीर आरोप, कंपनीने दिले स्पष्टीकरण

Subscribe

नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असून या प्रकरणात ए़डलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन या कंपनीवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्या कंपनीकडून आता एक परिपत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Art Director Nitin Desai) यांनी त्यांच्या कर्जत येथील एन. डी,. स्टुडिओमध्ये बुधवारी (ता. 02 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली. देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. परंतु त्यांची ही आत्महत्या नसून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजला. नितीन देसाई यांनी आत्महत्येआधी काही ऑडिओ क्लिप केल्या आहेत. यामध्ये त्यांनी एडलवाईज या कंपनीवर आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेमध्ये आमदार आशिष शेलार यांच्याकडून तर विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी या आत्महत्येच्या घटनेची सखोल चौकशीची मागणी केली. ज्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

हेही वाचा – Nitin Desai Suicide : “नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या…”; राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा दावा

- Advertisement -

परंतु, नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असून या प्रकरणात ए़डलवाईज अॅसेट रिकन्स्ट्रक्शन या कंपनीवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. ज्यामुळे ही कंपनी आता सर्वांच्या निशाण्यावर आली आहे. एडलवाईज या कंपनीकडून नितीन देसाई यांनी कर्ज घेतले होते. ज्यानंतर या कर्जाची किंमत 250 कोटींपर्यंत गेली. ज्यामुळे देसाई हे नैराश्यात आले होते. याच कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्या एडलवाईज कंपनीला नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणात दोषी करार देण्यात येत आहे. त्या कंपनीकडून आता एक परिपत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या कंपनीने आपली बाजू देखील या पत्राच्या माध्यमातून काढली आहे. नितीन देसाई यांच्या दुर्दैवी निधनामुळे आम्हाला अतीव दु:ख झाले आहे. अत्यंत कठीण काळातून जात असलेल्या देसाई कुटुंबीयांचे आम्ही सांत्वन करु इच्छितो, असे त्यांच्याकडून या पत्रकात लिहिण्यात आले आहे. (Explanation given by Edelweiss Company in Nitin Desai’s suicide case)

- Advertisement -

एडलवाईजने काय लिहिले पत्रकात?

एडलवाईजने या पत्रकात नितीन देसाई यांच्या कर्जाचा आढावा देत लिहिले आहे की, एनसीएलटी’ने नितीन देसाई यांच्या ND’s Art World Private Limited या कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश 25 जुलै 2023 रोजी दिले होते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ‘एनसीएलटी’ने जितेंद्र कोठारी यांची नियुक्ती केली होती. या निर्णयाविरोधात एनडीज आर्ट कंपनीने ‘एनसीएलटी’च्या दिल्लीतील खंडपीठाकडे अपील केले. मात्र, 01 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या खंडपीठाने देसाई यांचे अपील फेटाळून लावले.

तसेच, कर्जाचा संपूर्ण तपशील नमूद करत सांगितले की, ND’s Art World Private Limited कंपनीने नोव्हेंबर 2016 मध्ये 150 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये 35 कोटींचे अतिरिक्त कर्ज घेण्यात आले. जानेवारी 2020 पासून कंपनीचे कर्जाचे हप्ते थकण्यास सुरुवात झाली. ND’s Art World Private Limited कंपनीची कर्जाची एकूण थकबाकी 252 कोटी रुपये इतकी होती. या प्रकरणात आम्ही संबंधित यंत्रणांशी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -