घरताज्या घडामोडीढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नागपुरात दाखल

ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नागपुरात दाखल

Subscribe

सत्तांतरानंतर ते आज पहिल्यांदाच नागपुरात गेल्याने भाजप नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारल्यानंतर आज पहिल्यांदाच ते त्यांच्या मूळगावी म्हणजे नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सत्तांतरानंतर ते आज पहिल्यांदाच नागपुरात गेल्याने भाजप नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. (Fadnavis arrives in Nagpur after becoming Deputy Chief Minister)

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या जवळच्या अधिकाऱ्याची बदली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दणका

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार उलथवून लावून राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आले आहे. बहुमत चाचणीतही हे सरकार यशस्वी ठरले. सत्तांतराच्या नाट्यात देवेंद्र फडणवीस प्रत्यक्षात कुठेही दिसले नसले तरीही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे आश्चर्यकारकरित्या त्यांना उपमुख्यमंत्री पदावरही बसावं लागलं. त्यानंतर आज ते नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी नागपुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच, यावेळी जनतेच्या या प्रेमामुळेच आपण यशस्वी आहोत, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

हेही वाचा पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

- Advertisement -

सत्तेत आल्यानंतर रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. दोन्ही दिवसांचे अधिवेशन तुफान झाल्यानंतर फडणवीस आज नागपूर विमानतळावर सकाळी ११.३० वाजता दाखल झाले. त्यानंतर ढोल ताशांच्या  गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात हजर होते. फटाक्यांची आतिषबाजीही यावेळी करण्यात आली. तसेच, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी स्कूटर मिरवणूक काढली होती. धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे.


विमानतळापासूनच त्यांच्या जल्लोषाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केलं आहे. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आज मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे”, असं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -