घरताज्या घडामोडीप्रिया बेर्डेंनंतर 'ही' मराठी अभिनेत्री राष्ट्रवादीचे 'घड्याळ' हाती बांधणार

प्रिया बेर्डेंनंतर ‘ही’ मराठी अभिनेत्री राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता प्रिया बेर्डे यांच्यापाठोपाठ आणखी एक मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या मराठी अभिनेत्रीचं नाव सविता मालपेकर आहे. आता अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रावादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधणार आहेत.

सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर आणि प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. लवकरच यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -