घरCORONA UPDATEयंदा भाविकांसाठी आंगणेवाडीची प्रसिद्ध यात्रा बंद!

यंदा भाविकांसाठी आंगणेवाडीची प्रसिद्ध यात्रा बंद!

Subscribe

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मालवण आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीची यात्रा यंदाच्या वर्षी सर्वसाधारण भाविकांना खुली असणार नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ आंगणे कुटुंबियच देवीचे दोन दिवसांचे पारंपारिक धार्मिक पूजाविधी पूर्ण करणार आहे. राज्‍यात सध्या कोरोना ओसरत असला तरी धोका कायम आहे. आंगणेवाडीला दरवर्षी दोन दिवसांत ७ ते ८ लाख भाविक भेट देत असतात. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंगणेवाडीवासियांनी श्री भराडीदेवीचा आशीर्वाद घेऊनच हा निर्णय घेतल्‍याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत तसेच आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्‍कर आंगणे यांनी सोमवारी दिली.

दरवर्षी लाखो भाविक विशेषतः कोकण,मुंबईतील चाकरमानी दरवर्षी नित्‍यनेमाने आंगणेवाडीला जात असतात. बडे राजकारणी नेतेही मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात. यंदा ६ मार्च रोजी आंगणेवाडीची यात्रा आहे. मात्र कोरोनाच्या सुरूवातीपासून लॉकडाऊन लागू होण्याच्या आधीच आंगणेवाडी ग्रामस्‍थांनी कोरोनाचे नियम पाळायला सुरूवात केली होती. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जनतेला खबरदारी पाळण्याचे आवाहन केले. आतापर्यंत सर्वधर्मीय जनतेने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व सण घरीच साजरे केले. आंगणेवाडी ग्रामस्‍थांनीही हाच आदर्श ठेवत यंदाची यात्रा बाहेरच्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

केवळ आंगणेवाडीवासीयच या दोन दिवसात श्री भराडी देवीचे जे पारंपारिक पूजाविधी असतील ते पूर्ण करणार आहेत. इतर भाविकांनी आपल्‍या घरूनच श्री भराडी देवीला नमस्‍कार करावा, असे आवाहनही उदय सामंत यांनी केले. पालकमंत्री या नात्‍याने आपले आंगणेवाडीवासियांना पूर्ण सहकार्य राहणार आहे. त्‍यासंदर्भात आपण बैठकही घेतली आहे. दरवर्षी येणाऱ्या यात्रेकरूंनी यावर्षी कोरोना काळ लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे उदय सामंत म्‍हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -