Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम बीड हादरलं! जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद

बीड हादरलं! जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद

Related Story

- Advertisement -

जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर भर दुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र, तरुणाने वेळीच सतर्कता दाखवल्याने गोळीबारातून वाचला. भर दुपारी गोळीबार झाल्याने बीड हादरलं आहे. दरम्यान, या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये शुक्रवारी १६ जुलै रोजी पवन गावडे या तरुणावर गोळीबार झाला. मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर आहे. जवळच त्याचं बांधकाम साहित्याचे दुकान आहे. गावडे काल ३ वाजेच्या सुमारास त्याच्या दुकानासमोर थांबला होता. त्याचवेळी दोन तरुण दुचाकीवरुन आले. त्यानंतर त्या तरुणांनी ‘जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे’ असं सांगत त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

- Advertisement -

मात्र, पवन गावडे याने गुन्हा मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी पवनला धक्काबुक्की करायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. त्याचवेळी पवनने सतर्कता दाखवल्याने गोळी त्याच्या डोक्याला घासून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार आणि अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -