घरCORONA UPDATEकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले!

Subscribe

राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरत्या स्वरुपात बदलण्यात आले असून, तसा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे. या शासन निर्णया प्रमाणे  कॉंग्रेस नेते आणि राज्यमंत्री  विश्वजीत कदम यांच्या जागी कॉंग्रेस मंत्री सुनील केदार यांच्याकडे भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी तूर्तास सोपवण्यात आली असून, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद विजय वडेट्टीवार यांना पालकमंत्री मंत्री पद देण्यात आले आहेत. दरम्यान या पत्रकात अंशत: हे बदल केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान सुनील केदार यांच्याकडे  पशु दुग्धविकास मंत्री असून, आता त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. दरम्यान काही दिवसापूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे  पालकमंत्री पद गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली आहे. तत्कालीन पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या जागी आव्हाड यांना पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

म्हणून भंडारा- गडचिरोलीत पालकमंत्री बदलले –

दरम्यान सध्या राज्यात कोरोनाचे सावट असून मंत्री हे आपापल्या भागात लक्ष ठेवून आहेत. मात्र याचवेळी त्यांना त्यांच्याकडे  असलेल्या जिल्ह्याकडे फारसे लक्ष देता येत नाही त्याचमुळे राज्यातील सर्वच जिल्ह्याकडे व्यवस्थित लक्ष त्या त्या पालकमंत्र्यांना देता यावे यासाठी हे अंशत: बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नसलेल्या भागात सोमवारपासून उद्योगधंदे सुरू होणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -