घरमहाराष्ट्रशिवरायांचा अपमान करणारा छिंदम पुन्हा अडचणीत, टपरी चालकाला धमकावल्या प्रकरणी झाली अटक

शिवरायांचा अपमान करणारा छिंदम पुन्हा अडचणीत, टपरी चालकाला धमकावल्या प्रकरणी झाली अटक

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा नगरचे माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम यांनी पुन्हा एकदा तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात दोन महिन्यांपूर्वी एका टपरी चालकाला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच टपरी जेसीबीने उद्ध्वस्त करुन ती जागा हडप केल्याचा आरोपही छिंदम यांच्यावर करण्यात आले. यानंतर टपरी चालकाने पोलिसांत धाव घेतली.

मात्र गुन्हा घडल्यापासून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात छिंदम फरार होते. हे प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर छिंदमने न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला. मात्र, हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी छिंदमला अटक केली आहे. याविषयी तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सांगितले की, गुन्हा घडल्यापासून पोलिस श्रीपाद छिंदमचा शोध घेत होते, मात्र इतके दिवस ते फरार होते. अशातच काल रात्री नगर शहरात ते आल्याची माहिती आम्हाला मिळाली, त्यानुसार पोलिस पथकाने त्यांनी अटक केली. सध्या श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमला अटक केली असून अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे. याप्रकरणातील महेश सब्बन, राजेंद्र जमडादे आणि राजेंद्र म्य़ाना यांच्याविरोधात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे.

- Advertisement -

अहमदनगरच्या तात्कालीन उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने पालिका कर्मचाऱ्याशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्दांचा वापर केला होता. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. यानंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. या गुन्ह्यात त्याला अटक झाल्याने त्याचे नगरसेवक पद रद्द झाले. तो दुसऱ्यांदा निवडून आला मात्र तेही पद रद्द करण्यात आले. मात्र त्याच्या मूळ गुन्ह्याच्या निकाल अद्याप येणे बाकी आहे.

त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याच्याविरूद्धटपरी चालकाला जातीवाचक शिवागाळ केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला.
त्याचा भाऊ आणि तीस ते चाळीस जणांविरुद्ध दिल्लीगेट येथील भागीरथ भानुदास बोडखे या टपरी चालकाने हा गुन्हा दाखल केला आहे. ९ जुलै रोजी भागीरथ बोडखे त्यांच्या टपरीमध्ये काम करत असताना श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांच्यासह जमावाने जेसीबी व क्रेन घेऊन तेथे आले होते. त्यांनी बोडखे यांना जातीवाचक शिवीगाळ करत ज्यूस सेंटरमधील सामानांची तोडफोड केली. तसेच श्रीकांत व श्रीपाद छिंदम यांनी धमकी देत जातीवाचक शिवीगाळही केली. टपरीमधील सामान फेकून देत गल्ल्यातील ३० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. आरोपींनी बोडखे यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून बाजूला केली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आता या गुन्ह्यात दोघा छिंदम बंधुंना अटक झाली आहे.

- Advertisement -

मुस्लिम पुरुषाने हिंदू महिलेशी केलेला दुसरा विवाह कायद्याने अमान्य, गुवाहाटी कोर्टाचा निर्णय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -