घरCORONA UPDATEमहिलेच्या प्रसूतीनंतर २२ जण क्वारंटाईन

महिलेच्या प्रसूतीनंतर २२ जण क्वारंटाईन

Subscribe

पालिकेच्या नायगाव मॅटर्निटी होममधील प्रकार

मुंबईतील नायगाव येथील पालिकेच्या प्रसूतीगृहात दाखल एका गर्भवतीची शुक्रवारी सुखरूप प्रसूती झाली. परंतु ३ मे रोजी त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रसुतीगृहातील कर्मचाऱ्यांमधे भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, प्रसूतीगृहतील २१ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात वैद्यकिय अधिकाऱ्यासह ५ परिचारिका, ८ आया, ८ सफाई कामगार यांचा समावेश आहे.

चुनाभट्टी येथे राहत असलेली ३१ वर्षीय महिला ही प्रसूतीसाठी पालिकेच्या नायगाव प्रसूतीगृहात दाखल होती. ३० एप्रिलला या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. याच दरम्यान या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. ज्यामुळे तीन दिवसांपासून या महिलेच्या संपर्कात आलेला प्रसूतीगृहातील कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे महिलेवर उपचार करणाऱ्या मॅटर्निटी होममधील डॉक्टरांसह २१ कर्मचाऱ्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना ७ दिवस तर १८ कर्मचाऱ्यांना ५ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाबाधित महिलेला व बाळाला पवई येथील कोविड सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. बाळाची प्रकृती ठीक असून त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे वैधकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रसूतीगृहातील इतर २ रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -