Eco friendly bappa Competition
घर ठाणे मुंब्र्यात इमारतीची गॅलरी कोसळली, शंभर वर्षीय आजीबाईंची सुखरूप सुटका

मुंब्र्यात इमारतीची गॅलरी कोसळली, शंभर वर्षीय आजीबाईंची सुखरूप सुटका

Subscribe

ठाणे: मुंब्रा, पडलेकरवाडी येथे तळ अधिक एक मजली असलेल्या राणा निवास लोडबेरिंग चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरी पडल्याची घटना गुरुवारी दुपारी एक ते सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी घरामध्ये अडकलेल्या शंभर वर्षीय लक्ष्मी मंचेकर या आजीबाईंची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. तर घटनास्थळी चाळीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावण्यात आली आहे.

२० ते २५ वर्षे जुन्या चाळीच्या पहिल्या मजल्याची गॅलरी पडली असून एक महिला अडकल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी, टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी तातडीने धाव घेतली आणि अडकलेल्या शंभर वर्षीय आजीबाईंची सुखरूप सुटका केली.

- Advertisement -

सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. या चाळीत तळ आणि पहिल्या मजल्यावरती प्रत्येकी ४-४ सदनिका आहेत. सद्यस्थितीत ते ८ कुटुंब वास्तव्यास असून गॅलरी पडली ती खोली आणि त्याच्या खालील खोली रिकामी करण्यात आली असून चाळीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने धोकापट्टी लावण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.


हेही वाचा : पुण्यात ४० लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त, पोलिसांकडून संशयिताला


- Advertisement -

 

- Advertisment -