घरमहाराष्ट्रदहावी निकाल: पुन्हा मुलींची 'बाजी'

दहावी निकाल: पुन्हा मुलींची ‘बाजी’

Subscribe

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या दहावी इयत्तेचा निकाल, आज दुपारी १ वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. यंदाही दहावी बोर्डाच्या परीक्षेत राज्यभरातून मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९१.९७ टक्के तर मुलांचा ८७.२७ टक्के इतका लागला. यंदाही निकालामध्ये कोकण विभागाने आपले पहिले स्थान टिकवून ठेवले आहे तर नागपूरचा निकाल मात्र सर्वात कमी लागला आहे. या यादीत मुंबईने चौथा क्रमांक पटकावला आहे.

१ मार्च ते २४ मार्च दरम्यान राज्यभरातील नऊ मंडळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा एकूण निकाल ८९.४१% आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ०.६७ टक्क्यांनी यात वाढ झाली आहे.

- Advertisement -

कोकण विभागाने बारावीप्रमाणेच दहावीत देखील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यावर्षी राज्यातून एकूण १६ लाख ३६ हजार २५० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ इतका लागला आहे. परीक्षेत कमान २ विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांना एटीकेटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई विभागातून एकूण ३ लाख ३९ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ६ हजार १५१ विद्यार्थी उत्तीर्ण होत, मुंबईचा निकाल ९०.५१% इतका लागला.

”गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा दहावीचा ८९%टक्के निकाल लागला. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. तर ज्या विद्यार्थ्यांना यश मिळवता आले नाही त्यांनी नाराज होऊ नये. येत्या महिन्याभरात पुनर्परीक्षा होतील. ज्या विषाक्त आपण कमी पडलोय याची तयारी करावी.”  -विनोद तावडे

- Advertisement -

विभागानुसार निकालाची टक्केवारी

कोकण : ९६ %
कोल्हापूर : ९३.८८%
पुणे : ९२.०८%
मुंबई : ९०.४१ %
औरंगाबाद : ८८.८१%
नाशिक : ८७.४२%
अमरावती : ८६.४९%
लातूर : ८६.३०%
नागपूर : ८५.९७%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -