घरताज्या घडामोडीरतन टाटांना 'भारतरत्न' द्या; ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा

रतन टाटांना ‘भारतरत्न’ द्या; ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा

Subscribe

रतन टाटा हे मानवतेचं उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळे त्यांना 'भारतरत्न' द्यावा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. रतन टाटांना ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी करणारी ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या याचिकेला २ लाख ४० हजार लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. change.org या वेबसाईटच्या माध्यमातून ही याचिका करण्यात आली आहे. रतन टाटा हे मानवतेचं उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ द्यावा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, रतन टाटा वेळोवेळी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संशोधनासाठी मदत करण्यासाठी नेहमी पुढे येतात. रतन टाटा यांनी ज्या संस्थांना मदत केली आहे त्या सर्व संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टाटा ग्रुपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजसेवेचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे. तथापि, कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी याची घोषणा केली होती. टाटांनी निवेदन काढत, भारत आणि जगाची सध्याची परिस्थिती कमालीची चिंताजनक आहे. त्यावर त्वरीत कृती करणं गरजेचं आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा उद्योग समूह संकटाच्या काळात नेहमीच देशाच्या मदतीला धावून आला आहे, असं म्हटलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग का होतो?; शास्त्रज्ञांनी केला खुलासा


कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संसर्ग होण्याचा धोका असल्याने अशा डॉक्टरांना घरी जाता येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांच्या राहण्याची सोय करण्याचं आव्हान प्रशासनासमोर होतं. अशा परिस्थितीत टाटा समूह पुढे येत वैद्यकिय कर्मचाऱ्यांना टाटाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. यामध्ये ताज महाल पॅलेस, ताज लँड्स एंड, ताज संताक्रूझ, द प्रेसिडेंट, गिंगर एमआयडीसी अंधेरी, गिंगर मडगाव आणि गिंगर नोएडा या हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था केली.

- Advertisement -

 

एक प्रतिक्रिया

  1. मा. श्री. रतन टाटा यांना भारतरत्न ही पदवी देऊन गौरविलेच पाहिजे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -